महत्त्वाच्या बातम्या

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय भुईंज येथे स्नेहमेळावा संपन्न

शाळेतील मस्ती, एकत्रितपणे केलेला अभ्यास, शिक्षकांचा विद्यार्थ्यांवरील वचक, शाळेतील क्रीडा स्पर्धा, शिक्षकांनी दिलेली शिक्षा, स्नेहसंमेलन आणि त्यातील सांस्कृतिक कार्यक्रमाची धूम अशा विविध विषयांवर माजी विद्यार्थ्यांनी गप्पा करून जुन्या आठवणींना उजाळा दिला. या गप्पांच्या ओघात सर्वजण आपण इतके मोठे झालो हे विसरून गेले होते. निमित्त होते  स्नेह मेळाव्याचे. २००७-०८ वर्षी असणारी दहावी क ची बॅच जवळपास १७ वर्षापूर्वी शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा दि.१८ एप्रिल शनिवार रोजी  कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय भुईंज येथे आयोजित करण्यात आला होता.

वाई तालुक्यातील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय भुईंज या  शाळेत शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी आज राजकारण, उद्योग, शिक्षण, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात काम करीत असून त्यांनी आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटविला आहे. शाळेतील माजी विद्यार्थी एकत्र आल्यावर सर्वांचे स्वागत करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक ढाणे सर हे होते. कार्यक्रमाची सुरुवात कर्मवीर भाऊराव पाटील यांची प्रतिमा पूजन करून करण्यात आले. त्यांनतर शिक्षकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. २००८ मधील १० वी क वर्गातील सर्व विद्यार्थ्यांनी हा स्नेह मेळावा आयोजित करण्यासाठी पुढाकार घेतला होता. सर्व माजी विद्यार्थी एकत्र आल्यावर सर्वानी आपला परिचय दिल्यावर त्यावेळेच्या काही गमतीदार आणि काही चांगल्या आठवणींना उजाळा दिला. अनेक विद्यार्थी विहामांडवाच्या बाहेर असून ते या मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र आले होते. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करीत असताना जीवनात यश मिळवले असले तरी त्यामागे शाळेचे संस्कार आहेत, अशी भावना अनेक माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. यावेळी शाळेतील शिक्षक मुख्याध्यापक ढाणे सर, भोईटे सर, सकुंडे मॅडम, देशमुख मॅडम, यादव मॅडम आदी उपस्थित होते. शिक्षकवृंदानी केलेल्या मनोगतामध्ये त्यांना या बॅचचा खूप अभिमान असल्याचे मत व्यक्त केले आणि जीवन सार्थक झाले असे म्हणाले. यावेळी शिक्षकांनी सामाजिक बांधिलकी यावर मार्गदर्शन केले. या ग्रुपच्या माध्यमातून समाजातील गरजू घटकांना मदत करण्याचे आवाहन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देगाव गावचे सरपंच श्री सुरज पिसाळ यांनी केले, प्रस्तावना श्री हेमंत बाबर यांनी केली व आभार शकविता बोराटे यांनी मानले यांनी मानले. कार्यक्रमाच्या
यशस्वीतेसाठी वर्गातील सर्व मित्र मैत्रिणींनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!