साताऱ्यातील मोती चौकात आज्ञातांनी महिलेस लुटले
सातारा येथील राजवाडा परिसरातील मोती चौक येथे 9 ऑक्टोबर रोजी आज्ञातांनी महिलेच्या हातातील सोने असलेली पिशवी चोरी केली. अंजना एकनाथ शिंदे (वय 61 रा.मंगळवार पेठ) असे तक्रार दाखल केलेल्या महिलेचे नाव आहे. अंजना शिंदे यांनी सोने खरेदी केल्यानंतर ते पर्स मध्ये ठेवले. सोन्यासोबत पर्स मधे चांदीचे पैंजण, मोबाईल, रोख रक्कम असा एकूण 66 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल चोरून पळ काढला.
ही घटना 9 ऑक्टोबर रोजी रात्री घडली मात्र अंजना यांनी कुटुंबियांशी चर्चा करून उशिरा शाहूपुरी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली.
