महत्त्वाच्या बातम्या

कोरेगाव चे मा.आमदार शशिकांत शिंदे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा

 कोरेगाव-
मा  केंद्रीय मंत्री शरद पवार यांचे कट्टर समर्थक व कोरेगाव चे मा आमदार शशिकांत शिंदे यांचा वाढदिवस कोरेगाव येथील त्यांच्या निवासस्थानी आज मोठ्या उत्साहात पार पडला.
आज सकाळी हुमगाव तालुका जावली येथील  ग्रामदेवता हुमजाई  देवीचे दर्शन घेऊन त्यांनी स्थानिकांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला. तदनंतर त्यांनी कार्यकर्त्यांच्या रॅलीने कोरेगाव येथे प्रस्थान केले.
यावेळी कार्यकर्त्यांची रीघ लागली होती. आर्थिक सामाजिक राजकीय शैक्षणिक तसेच पुणे मुंबई येथील त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छा चा वर्षाव केला. वाढदिवसानिमित्त अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात आले यावेळी आमदार शशिकांत शिंदे यांची ग्रंथ तुला करण्यात आली यावेळी जिल्ह्यातील शरदचंद्र पवार गटाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!