अजिंक्य पिसाळ याची वायु सेनेत निवड
भुईंज: अजिंक्य पिसाळ याची वायू सेनेत निवड एन डी ए च्या प्रशिक्षण व अभ्यासक्रम साठी पात्र ठरलेल्या अजिंक्यवर अभिनंदनाचा कौतुकाचा वर्षाव होत आहे. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी NDA येथे भारतीय वायू सेनेच्या फ्लाईंग ऑफिसर म्हणून स्पर्धापरीक्षा देऊन निवड झालेल्या अजिंक्य पिसाळ हा लहानपणापासूनच सायकलपटू असून त्याने देशभरात सायकल वरून प्रवास केला आहे. देशसेवा करण्यासाठी तो वायुसेनेत जाऊन लढाऊ विमानाचे नेतृत्व करणे हे त्याचे स्वप्न होते.
अजिंक्य पिसाळ हा गरवारे फायबर्स कँपनी चे प्रोडक्शन म्यानेजर संजय पिसाळ व वाई औद्योगिक प्रशिक्षण संस्थाचे प्रशिक्षिका सौ नीता पिसाळ यांचा सुपुत्र असून जेष्ठ पत्रकार जयवंत पिसाळ यांचा पुतण्या आहे. त्याचे निवडीचे सर्वत्र स्वागत व अभिनंदन होत आहे. भुईंज येथे ज्ञानेश्वरी पारायण मंडळाच्या व प्रेस क्लबच्या वतीने त्याचा सत्कार समारंभ होणार असल्याची माहिती रामदास जाधव,राहुल तांबोळी, विलास साळुंखे यांनी दिली आहे.
