डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्य वाई तालुका अध्यक्षपदी बापू वाघ यांची निवड
भुईंज:डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्य वाई तालुका अध्यक्षपदी कळभे गावचे सुपुत्र बापू वाघ यांची निवड झाली आहे. या मिळालेल्या संधीचे त्यांनी आपल्या पत्रकारिता क्षेत्रात समाजासाठी योगदान देऊन उत्तम काम करून सोने करावे असे प्रतिपाद सामाजिक कार्यकर्ते व गावचे मा उपसरपंच हणमंतराव गायकवाड यांनी केले.कळंभे ता.वाई येथील विकास सेवा सोसायटीच्या वतीने घेण्यात आलेल्या कार्यक्रमावेळी ते बोलत होते. यावेळी विकास सेवा सोसायटी चेअरमन श्री विश्वनाथ जगन्नाथ शिवथरे, व्हा चेअरमन श्री शिवाजी खाशाबा गायकवाड,युवा नेते माजी उपसरपंच श्री हणमंतराव भगतसिंग गायकवाड,जावली तालुका पत्रकार संघांचे अध्यक्ष प्रशांत गुजर,मा सरपंच संतोष तुकाराम चव्हाण, मा सरपंच संतोष ज्ञानोबा गायकवाड, सोसायटीचे मा चेअरमन संतोष शंकर, गायकवाड श्री बाळासाहेब लक्ष्मण जाधव,श्री संदीप फत्तेसिंग गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना गायकवाड म्हणाले, बापू वाघ यांच्या रूपाने तालुक्याच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आमच्या गावाला मिळाली आहे त्यामुळे आम्हाला त्याबद्दल अभिमान आहे.सत्काराला उत्तर देताना बापू वाघ म्हणाले की, मी गेल्या सन 2012 पासून इलेक्ट्रॉनिक मीडिया लोकवृत्त न्यूज व्ही एम न्यूज व सातारा न्यूज अशा ठिकाणी वाई प्रतिनिधी म्हणून काम करत आलो आहे.
या माझ्या कार्यकाळात शैक्षणिक सामाजिक तसेच इतर गोष्टींना बातमीतून उजाळा देण्याचे काम केलं आहे अशाच प्रकारे मी पुढेही काम करून मला मिळालेल्या संधीचे सोने करील. डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने, संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष शिराळे यांनी मला काम करण्याची संधी दिली आहे. त्यांचे मी आभारी आहे,याद्वारे मी जास्तीत जास्त चांगले काम करून माझी जबानदारी पार पाडणार आहे.
यावेळी बापू वाघ व प्रशांत गुजर यांच्या निवडीबद्दल सोसायटीच्या वतीने शाल,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी विकास सेवा सोसायटी संचालक श्री यशवंत शंकर शिवथरे, डॉ श्री तानाजी शंकर शिवथरे, श्री दत्तात्रेय किसन शिवथरे, श्री दत्तात्रेय नारायण जाधव, श्री सचिन सदाशिव गायकवाड, श्री रामदास रघुनाथ वाघमारे,श्री सूर्यकांत सिताराम वेदपाठक, श्री मोहन सर्जेराव पवार, श्रीमती समुद्र बळवंत शिवथरे, सुमन कुंडलिक शिवथरे, सचिव श्री बाबासो आप्पासो गायकवाड, लेखनिक काशिनाथ बाबा शिवथरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.सूत्रसंचालन संतोष चव्हाण यांनी तर आभार व्हा चेअरमन शिवाजी गायकवाड यांनी मानले.
