महत्त्वाच्या बातम्या

अमित कुकडे आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्काराने सन्मानित

    अमित शांताराम कुकडे यांना आदर्श ग्रामहसूल अधिकारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सद्या ते पिंगळी बुद्रुक (ता. माण )याठिकाणी ग्राममहसूल अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.१ मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमामध्ये पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. अमित कुकडे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून माण तालुक्यातील आंधळी, पिंगळी, महिमानगड, पांढरवाडी, स्वरूपखानवाडी यासारख्या ठिकाणी महसूल विभागाच्या विविध योजना प्रभाविपणे राबविल्या यामध्ये मराठा सर्वेक्षण, ऍग्री स्टॅक योजनेची माहिती, ई-पीक पाहणी अशा प्रशासनाच्या विविध योजनेची माहिती शेतकऱ्यांना देऊन संबंधित योजना यशस्वीरित्या पार पाडल्या, शासन आपल्या दारी, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान प्रारूप मतदार यादी तयार करण्यापासून अंतिम मतदार यादी तयार होईपर्यंत अतिशय प्रभावीपणे काम केले.

          महसूलच्या गौण खनिजांची चोरी होऊ नये म्हणून तलाव,नदी नाले या ठिकाणी रात्रीच्या वेळी पहारा दिला अशा सर्वच आदर्श कामगिरीचा आढावा घेऊन महसूल प्रशासनाने त्यांना आदर्श महसूल ग्राम अधिकारी म्हणून पुरस्कार देऊन सन्मानित केले.या पुरस्काराबद्दल महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, माण खटाव प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर, तहसीलदार विकास अहिर व माण तालुक्यातील सर्व महसूल कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!