महत्त्वाच्या बातम्या

अजिंक्य पिसाळ याचा जेष्ठ ग्रामस्थांच्या मार्फत सत्कार

भुईंज:  जेष्ठ नागरिक हे गावाचे आधारवड तर आहेतच पण त्यांना सार्वजनिक कामात सामावून घेतल्यास ते संकट मोचक म्हणून आदर्शवत भूमिका बजावून आपल्या ज्ञानाचा व अनुभवाचा ठेवा नव्या पिढीला देताना त्यांनाही समाधान लाभेल यासाठी जेष्ठांना सन्मानाने वागवा असे आवाहन जेष्ठ विचारवंत  ऍड. प्रताप देशमुख यांनी केले.

         भुईंज येथे जेष्ठ नागरिक संघाच्यावतीने आयोजित गुणवंत नागरिकांचा गौरव सोहळा व मासिक मिटींग निमित्त कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ विचारवंत अॅड. प्रताप देशमुख बोलत होते. अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष रामदागवापू जाधव होते. तर विशेष उपस्थितीत उपाध्यक्ष जगन्नाथ दगडे, मचिव अशोकराव चव्हाण, रमेश आबा भोसले आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना जेष्ठ विचारवंत अॅड. प्रताप देशमुख पुढे म्हणाले की, भुईंजच्या जेष्ठ नागरिक संघाचे उपकम नेहमीच उपक्रमशील असतात. जेष्ठांचा आदर राखत केलेले संघटन कौतुकास्पद असून त्यांच्या आजपर्यंतच्या जगलेल्या आयुष्याची बेरीज वजाबाकी केल्यास मिळणारे उत्तर हे समाधानाचे असावे असे चित्र सर्वत्र अनुभवयाला मिळते. 

      प्रारंभी गष्ट्रीय संरक्षण प्रचोदिणी मध्ये निवड झालेला अजिंक्य मंजय पिसाळ, देशात धणुविद्या स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवून दुसरा नंबर मिळवणारा देवांश अनिकेत पिसाळ तर सीमा सुरक्षा दलात भरती झालेला रोहित अतुल भोसले, डॉ. प्रणाली भास्कर घोणे यांना वैद्यकिय क्षेत्रातील पदवी मिळाल्याव‌द्दल तसेच शैला बाजीराव भोसले यांना शेती क्षेत्रातील राज्यपाल पुरस्कार मिळाल्यावद्दन विशेष सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.उपस्थितांचे स्वागत रमेश आबा भोसले, रमेश भोसले पाटील यांनी केले तर प्रास्ताविक दिलीप दळवी यांनी केले. आभार भगवान चव्हाण यांनी मानले तर सुत्र संचालन पत्रकार जयवंत पिसाळ यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!