भारत पाक युद्धात भारतीय सैन्य दलाचे जवान मुरली नाईक शहिद
भारत पाकिस्तान सीमेवर सुरु असलेल्या युद्धात भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवादी (terrorist) तळांवर हल्ले केले. त्यांनंतर त्याचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानने सीमारेषेवर गोळीबार सुरू केला आहे. भारतीय सैन्य दलानेही या गोळीबाराला चोख प्रत्त्युत्तर दिलं असून पाकिस्तानी रेंजर्सना तडाखा दिला आहे. पाकिस्तानशी लढा देताना भारतीय सैन्य दलाचे 2 जवान शाहिद झाले आहेत.दरम्यान भारत पाक सीमारेषेवर तणाव पाहायला मिळत आहे. या चकमकीत मूळचे आंध्र प्रदेशाचे मुरली नाईक यांना वीर मरण आले आहे. ते सध्या मुंबई चे रहिवासी होते.
युद्धात वीर मरण आलेल्या दुसऱ्या भारतीय सैन्याच्या जवानाचे नाव दिनेश शर्मा असे आहे. यांनाही पूँछ सेक्टरमध्ये पाकिस्तानशी लढताना वीरमरण प्राप्त झाले. गोळीबारात जखमी झाल्यानंतर शर्मा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
मुरली नाईक हे सत्यसाई जिल्ह्यातील गोरंटला तालुक्यातील रहिवासी होते.मूळचे आंध्र प्रदेशचे रहिवासी असलेले नाईक कुटुंब हे कामराज नगरच्या झोपडपट्टीमध्ये राहत होते. मात्र सदर झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पा अंतर्गत पाडण्यात आल्याने नाईक कुटुंब आंध्र प्रदेश येथे राहण्यास गेले आहे. आज पहाटे 3 वाजता झालेल्या हल्ल्यात मुरली नाईक यांना मरण आले.
