किकली शाळेत बॅच 2007-08 चा स्नेहमेळावा संपन्न
भुईंज: शाळेतील वर्गात घेतलेले शिक्षण, मागील बेंच वरील केलेली मस्ती, शिक्षकांचा विद्यार्थ्यांवरील धाक, शाळेतील क्रीडा स्पर्धा, स्नेहसंमेलन आणि त्यातील सांस्कृतिक कार्यक्रमाची धूम अशा विविध विषयांवर माजी विद्यार्थ्यांनी गप्पा मारून जुन्या आठवणींना उजाळा दिला. या गप्पांच्या ओघात सर्वजण आपण इतके मोठे झालो हे विसरून गेले होते. निमित्त होते स्नेह मेळाव्याचे. २००७-०८ वर्षी असणारी दहावीची बॅच जवळपास १७ वर्षापूर्वी शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा दि.10 मे शनिवार रोजी न्यू इंग्लिश स्कूल किकली येथे आयोजित करण्यात आला होता.
न्यू इंग्लिश स्कूल किकली शाळेत शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी आज उद्योग, शिक्षण,देशसेवा, , सामाजिक क्षेत्रात काम करीत असून त्यांनी आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटविला आहे. शाळेतील माजी विद्यार्थी एकत्र आल्यावर सर्वांचे स्वागत करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक खेतमर सर हे होते. कार्यक्रमाची सुरुवात स्वामी विवेकानंद यांची प्रतिमा पूजन करून करण्यात आली. त्यांनतर शिक्षकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. २००८ मधील १० वी च्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांनी हा स्नेह मेळावा आयोजित करण्यासाठी पुढाकार घेतला होता. सर्व माजी विद्यार्थी एकत्र आल्यावर सर्वानी आपला परिचय दिल्यावर त्यावेळेच्या काही गमतीदार आणि काही चांगल्या आठवणींना उजाळा दिला. अतुल चव्हाण यांनी आराम हॉटेल वेळे येथे सर्वांना मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र स्नेहभोजन दिले . वेगवेगळ्या क्षेत्रात काम करीत असताना जीवनात यश मिळवले असले तरी त्यामागे शाळेचे संस्कार आहेत, अशी भावना अनेक माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षक श्री माने व्ही एस., श्री वर्णे सर, श्री. नारकर सर आदी उपस्थित होते. शिक्षकवृंदानी केलेल्या मनोगतामध्ये त्यांना या बॅचचा खूप अभिमान असल्याचे मत व्यक्त केले आणि जीवन सार्थक झाले असे म्हणाले. यावेळी शिक्षकांनी सामाजिक सलोखा राखून आपले व जीवमान कसे उंचवावे यावर मार्गदर्शन केले. या ग्रुपच्या माध्यमातून शाळेतील कमी होतं असलेला पट वाढवा म्हणून प्रयत्न केले जाणार आहेत व गरजू विद्यार्थी यांना मदत करण्याचे आवाहन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री हेमंत बाबर यांनी केले व अतुल चव्हाण यांनी मानले. कार्यक्रमाच्यायशस्वीतेसाठी वर्गातील सर्व मित्र मैत्रिणींनी सहकार्य केले.
