महत्त्वाच्या बातम्या

यवतेश्वर घाटात डंपर पलटी

    साताऱ्यातील यवतेश्वर घाटात डंपर पलटी झाल्याची घटना घडली आहे. कासहुन साताऱ्याच्या दिशेने येत असताना हा अपघात झाला. कास बाजूने सातारा शहराकडे येताना यवतेश्वर घाट लागतो.उन्हाळा पावसाळा, तसेच हिवाळ्यात या ठिकाणी पर्यटकांची वर्दळ असते. सायंकाळच्या वेळी काही लोक घाटात सूर्यास्ताचा आनंद घेण्यासाठी, फोटो शूट साठी येत असतात. यवतेश्वर, कास  पठार ही लोकांची पर्यटनाची आवडती ठिकाणे आहेत. एप्रिल- मे महिन्यात सुट्टयामध्ये मजा करण्यासाठी लोक येथे येत असतात. त्यामुळे घाटात लोकांची वर्दळ असते.आज सायंकाळी यवतेश्वर घाटात  असणाऱ्या पॉवर हाऊस जवळ हा अपघात झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली. 
        घटना स्थळावरून मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार, दोन महिला रस्ता ओलांडून जात होत्या त्या महिलांना वाचवण्यासाठी डंपर चालकाने अचानक ब्रेक मारल्याने चालकाचे डंपर वरील नियंत्रण सुटले व डंपर पलटी झाला. सदर अपघातात 2 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!