महत्त्वाच्या बातम्या

दहिवडी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी 

       मलवडी (ता. माण) येथे घर दुरुस्तीच्या कामासाठी पाठविलेल्या कामगाराने लंपास केलेल्या दीड लाख रुपयांसह कामगाराला तत्काळ अटक करण्याची कामगिरी दहिवडी पोलिसांनी केली आहे.याबाबत दहिवडी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मलवडी येथील दशरथ बोराटे यांच्या घर दुरुस्तीच्या कामासाठी असलेल्या दादासो रामचंद्र जगदाळे (रा. शिरवली, ता. माण) याने कोणाचे लक्ष नाही हे पाहून बेडमध्ये ठेवलेले १ लाख ५० हजार रुपये व त्यांची पत्नी मंगल हिचे पर्स मधील ३६०० रुपये लांबवले. कुणीतरी पैसे चोरल्याचे लक्षात येताच दशरथ बोराटे यांनी याबाबत दहिवडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

           या तक्रारीवरुन दहिवडी पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दत्तात्रय दराडे, महिला पोलिस उपनिरीक्षक चांदणी मोटे व स्वाती धोंगडे, पोलिस उप निरीक्षक यशवंत जामदार व गुलाब दोलताडे, सहाय्यक पोलिस उप निरीक्षक प्रकाश हांगे, पोलिस हवालदार नितीन धुमाळ, पोलिस कॉस्टेबल अजिनाथ नरबट, महेंद्र खाडे, निलेश कुदळे, यांनी गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेवून दादासाहेब जगदाळे याला अटक केली. तसेच त्याच्याकडून चोरलेली रोख रक्कम १,५३,६०० रुपये हस्तगत करुन जप्त केली. आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलिस उप निरीक्षक प्रकाश हांगे करीत आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!