महत्त्वाच्या बातम्या

वाघोलीतील दगडखाण अतिक्रमणधारकांच्या यादीमध्ये सावळा गोंधळ

वाघोलीतील गायराण जमिनीवर अनेक वर्षे राहणाऱ्या अतिमागास व आर्थिक दुर्बल दगडखाण कामगार कुटुंबांना शासन निर्णयानुसार प्रत्येक कुटुंबांला विनामुल्य भूखंड वाटप करणे कामी नुकतीच जिल्हाधिकारी यांचे अध्यतेखाली बैठक संपन्न झाली.मौजे वाघोली येथील स.न. १२९/१, ११२3, १४१९ a १५६७ मधील 1 जानेवारी 2011  किंवा पूर्वी निवास प्रयोजनासाठी  अतिक्रमण करून राहणाऱ्या खाण कामगारांची यादी ग्रामपंचायत/ गटविकास अधिकारी हवेली यांचे कडून प्राप्त करून सदर यादीची तपासणी करून अंतिम पात्र लाथार्थीच्या यादीसह जागा मागणी प्रस्ताव पंधरा दिवसात जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्याचे आदेश पुणे महानगर पालिकेला देण्यात आले आहेत. 

        पुणे महानगरपालिकेतील संबंधित अधिकाऱ्यांशी विचारणा केली असता सदर विषयांची जबाबदारी सह उपायुक्त नगररोड वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालय पुणे महानगर पालिकेकडे वर्ग करण्यात आले आहे असे दिसून आले.सदर प्रलंबित प्रकरणी  वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालयाचे महापालिका सह उपायुक्त संजय पोळ यांचे बरोबर आज बैठक घेण्यात आली, बैठकीत  दगडखाण कामगार विकास परिषद महाराष्ट्रच्या वतीने निवेदन देण्यात आले असून निवेदनाला अनुसरून झालेल्या मॅरेथॉन बैठकीमध्ये ग्रामपंचायतीने केलेला अतिक्रमण धारकांचा सर्वे हा पूर्वग्रह दुषीत व जाणिवपूर्वक आपल्या खास मर्जीतील लोकांकडे पाहूनच ही यादी तयार केल्यामुळे वास्तवात 1 जानेवारी 2011 पूर्वीचे पुरावे असताना देखील सुमारे पन्नास टक्के कुंटुंबाना वगळण्यात आले आहे. घराची मोजमापे चुकीची घेतलेली आहेत, काहीं मर्जीतील कुंदुंबांची दुबार तिबार नावे तसेच काही  मयत व अविवाहीतांची देखील नावे यादी मध्ये घेण्यात आली असल्याने ग्रामपंचायतीने तयार केलेल्या अतिक्रमण धारकांच्या यादीत सावळा गोंधळ माजलेला आहे.

          महानगरपालिकेने वाघोली अतिक्रमण धारकाची यादी अंतिम करण्यापूर्वी जुन्या सर्वे / यादीतील सर्व त्रुटी दुरुस्त करूनच अंतिम यादी प्रसिद्ध करावी तदनंतरच प्रस्ताव जिल्हाधिकार्यांकडे लवकरात लवकर सुपूर्द करावा, तसेच अनधिकृतपणे कचरा डेपो असलेला भूखंड दगडखाण महिला कौशल्य विकास भवनासाठी मंजुर करावा अशा मागण्या आज दगडखाण असंघटित कामगार विकास परिषद महाराष्ट्रच्या शिष्टमंडळाने    सह उपायुक्त संजय पोळ व उप अभियंता अशोक सांगडे  यांच्याकडे केली. शिष्टमंडळामध्ये अँड. बी.एम.रेगे,  अँड. पल्लवी रेगे, सामाजिक कार्यकर्ते राजू शिरसाठ, अंबादास साळुंखे, संदीप मोरे, गणीभाई शेख, कांताबाई पवार, शिवाजी दंडगुले, मर्याप्पा चौगुले, प्यारेलाल जाठव, महादेव मंजुळे, नंदकुमार जाधव,  अदिनाथ चांदणे आदी उपस्थित होते.गटविकास अधिकारी यांचे मार्फत अतिक्रमण धारकांची यादी प्राप्त झाल्यानंतर कोणावर अन्याय नकरता सर्वाना समान हक्क देण्याचे आश्वासन सह उपायुक्त  संजय पोळ यांनी शिष्टमंडळास दिले.

महानगर पालिकेने वाघोली  गायराणातील अतिक्रमण धारकांचा पारदर्शकतेने सर्वे करून अचूक यादीसह त्वरीत प्रस्ताव जिल्हाधिकारी यांचे कडे पाठवा- अँड बी.एम्. रेगे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!