मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घेण्यासाठी या अटी व शर्ती
सातारा: राज्यातील शहरी व ग्रामीण क्षेत्रातील बेरोजगार युवक युवतींची वाढती संख्या व उद्योग व्यवसाय क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या स्वयंरोजगाराच्या संधी विचारात घेवुन मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही योजना राबवली जाते. ही योजना जिल्हा उदयोग केंद्र व महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ सातारा कार्यालयामार्फत चालविण्यात येते.
योजनेचा लाभ घेण्यासाठी अटी व शर्ती
▪️या योजनेच्या लाभार्थ्याचे सर्वसाधारण किमान वय १८ वर्ष पुर्ण असावे.
▪️अर्जदार इयत्ता ८ वी उत्तीर्ण असावा.
▪️यामध्ये वार्षिक उत्पन्नाची अट नाही.
▪️वैयक्तिक, भागीदारी, वित्तीय संस्था मान्यता दिलेले बचत गट, संस्था सोसायटी, स्वयंसहाय्यता बचत गट यांना नवीन उद्योगासाठी ही योजना लागु आहे.
▪️कुटुंबातील एका व्यक्तीस, पती किंवा पत्नी या पैकी एकास या योजनेचा लाभ घेता येईल.
▪️लाभार्थीने यापुर्वी राज्य शासनाच्या तसेच केंद्र शासनाच्या महामंडळाच्या या योजनेतुन लाभ घेतलेला नसावा.
या योजनेमध्ये सर्वसाधारण प्रवर्गावसाठी कर्ज रक्कम ५० लक्ष व २० लक्ष सेवा उदयोग या रकमेवर देण्यात येणारे अनुदान पुढीलप्रमाणे आहे.
▪️स्वगुंतवणुक १० टक्के अनुदान,
▪️शहरी १० टक्के,
▪️ग्रामीण २५ टक्के
▪️बँक कर्ज शहरी ७५ टक्के,
▪️ग्रामीण ६५ टक्के,
विशेष प्रवर्ग अनु.जाती/जमाती / महिला / अपंग/ माजी सैनिक/इतर मागास प्रवर्ग, व्हि.जे. एन.टी कर्ज रक्कम ५० लक्ष उदयोग उत्पादन २० लक्ष सेवा उदयोग या रकमेवर देण्यात येणारे अनुदान पुढीलप्रमाणे
▪️स्वगुतंवणुक ५ टक्के अनुदान
▪️शहरी २५ टक्के
▪️ग्रामीण ३५ टक्के
▪️बॅक कर्ज शहरी ७० टक्के
▪️ग्रामीण ६० टक्के
या योजनेचा लाभ घेण्यासाठी www.maha-cmegp.gov.in या वेबसाईटवर अर्ज करावा.
