ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा अनागोंदी कारभार; केस पेपर बंद, औषध गोळया संपल्या, नागरिकांमध्ये संताप
माण तालुक्यातील दहिवडी ग्रामीण रुग्णालयाचा अनागोंदी व बेशिस्त कारभार आज समोर आल्यामुळे नागरिक संतापले असून डॉक्टरांना व कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्याची गरज निर्माण झाली आहे. दहिवडी ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर अंशुमन धुमाळ यांना फलटण आणि दहिवडी येथील दोन्ही रुग्णालयाचे कामकाज पाहावे लागते. परंतु ते दहिवडी येथे कधी असतात हे रुग्णांना माहीतच नाही. कधी येतात आणि कधी जातात हे देखील काही समजत नाही. का येतच नाहीत! असा संभ्रम नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे येथील कर्मचारी बेशिस्त झाले असल्याचे दिसून येत आहे. ५ शिपाई कर्मचारी असताना देखील एकही शिपाई आज कामावर हजर नव्हते. सोमनाथ सुर्वे हे कर्मचारी गेले ४५ दिवस झाले रजेवर असल्याचे सांगण्यात आले. विशाल निकम हे कर्मचारी आज आलेच नव्हते. त्यांची रजा आहे का दांडी मारली हे सांगण्यासाठी डॉक्टरच उपलब्ध नाहीत. कर्मचारी उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांची हेळसांड होत आहे. अशा मजूर कर्मचाऱ्यांना अद्दल घडविण्यासाठी दहिवडी नगरपंचायतीचे नगरसेवक रुपेश मोरे. सातारा येथील सिव्हिल हॉस्पिटल समोर डॉक्टर आणि कर्मचारी यांच्या विरोधात आंदोलन करणार असल्याचे सांगितले.
केस पेपर देण्यासाठी कर्मचारीच नाही…
केसपेपर काढल्याशिवाय पुढील तपासणी करता येत नाही. आणि बऱ्याचदा नेमका योगायोग असा घडतो की केस पेपर काढणारा कर्मचारी पण बेपत्ता आहे.
औषधे संपली कशी….
केस पेपर नाही त्यामुळे औषधे मिळणार नाहीत आणि औषध साठा संपला आहे. अशी उत्तरे देऊन रुग्णांना परत पाठविले आहे.औषधे संपली कशी काय असा नागरिकांना पडलेला प्रश्न आहे.
डॉ. करपे साहेब लक्ष घाला
डॉक्टर वेळेवर येत नाही. कधी येतात कधी जातात माहिती नाही. कर्मचारी कुठे असतात कोणालाच माहिती नसते. अशा बेशिस्त कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी करपे साहेब लक्ष घाला अशी मागणी दहिवडीचे नगरसेवक रुपेश मोरे यांनी केली आहे.
