महत्त्वाच्या बातम्या

पुणे शहरातील मंडई मेट्रो स्टेशनला लागली आग… अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल

        पुणे शहरातील मंडई मेट्रो स्टेशनला सोमवारी मध्यरात्री आग लागली. मंडई मेट्रो स्टेशनच्या तळमजल्यावर ही आग लागली होती. ही घटना रात्री घडली असे एका अधिकाऱ्याने सांगितले. या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही.वेल्डिंगचे काम सुरू असताना फोमने ही आग लागली असे अग्निशमन दलाचे म्हणणे आहे.रात्री बाराच्या सुमारास आग लागली व प्रचंड धुराचे लोट पसरले.आगीची माहिती मिळतात अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या व आग विझवण्यात आली.आग नियंत्रणात आल्यामुळे मेट्रो सेवेवर कोणताही परिणाम झाला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!