बोपदेव घाटात खंडणी प्रकरणी पोलीस कॉनस्टेबलवर गुन्हा दाखल
पुण्यातील कोंढवा पोलिस ठाण्यातील एका पोलिस कॉन्स्टेबलवर खंडणी घेतल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 30 हजार रुपयांची मागणी करून तडजोड करत 28 हजार रुपये त्याने गुगल पे ला ट्रान्सफर करून घेतले.विक्रम लक्ष्मण वडतिले असे या कॉन्स्टेबलचे नाव आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, एक तरुण आपल्या मित्रासमवेत बोपदेव घाटात गेला होता त्यावेळी ही घटना घडली. पोलीस कॉनस्टेबल वडतिले यांनी त्या दोघांना थांबवले व त्यांची झडती घेतली. तरुणाच्या बॅगेत हुक्का पॉट आढळला. वडतिले यांनी लाच न दिल्यास कारवाई ची धमकी दिली. हा तरुण चेन्नई चा रहिवासी आहे. तरुणाने कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली ज्यामुळे वडतिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर, वडतिले यांना पोलिस खात्यातून निलंबित करण्यात आले आहे.
