तहसील कार्यालयात साचले पावसाचे पाणी ; रांगेत उभे राहून नागरिक संतप्त
सातारा शहरातील पोवई नाका परिसरात असणाऱ्या तहसील कार्यालयात पावसाचे पाणी साचले आहे. तहसील कार्यालयात मार्च महिन्या पासून दाखले काढण्यासाठी गर्दी होते. विद्यार्थ्यांना शाळा कॉलेज मध्ये वेगवेगळे दाखले जमा करायचे असतात. त्यासाठी कार्यालयात लोकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत.
यावेळी अवकाळी पावसाने मे महिन्यातच हजेरी लावली आहे. सातारा शहरात मुसळधार पाऊस झाल्याने तहसील कार्यालयात पाणी साठले आहे. लोकांना या पाण्यात तासंतास रांगेत उभे राहावे लागत आहे. कार्यालतील कर्मचारी निवांत, रटाळवाने काम करत असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. पावसाच्या पाण्याने परिसरात मच्छर झाले असून त्यामुळे लोक आजारी पडण्याची संभावना नाकारता येत नाही.
