महत्त्वाच्या बातम्या

48 लाखांची खंडणी उकळणाऱ्या कुख्यात गुंडास अटक; कोण आहे आंदेकर टोळीचा म्होरक्या ? 

         पुणे पोलिसांनी 48 लाख रुपयांच्या खंडणी प्रकरणी कुख्यात गुंड शिवम सूर्यकांत आंदेकर याला अटक केली आहे. त्याने त्याच्या साथीदारासह नाना पेठेतील एका ३८ वर्षीय मासे विक्रेत्याकडून गेल्या आठ वर्षांपासून ४८ लाख रुपयांची खंडणी वसूल केली. 
        पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवम आंदेकर याने मासे विक्रेत्याला व्यवसायाचे व जीवाला धोका निर्माण करून दरमहा 50,000 रुपये देण्यास भाग पाडले जात होते. हे सुमारे 2016 पासून सुरु होते. आंदेकर टोळीचा एक सदस्य आकाश परदेशी (वय 28) याने मासे विक्रेत्याला वारंवार जीवे मारण्याची धमकी देऊन त्याच्याकडून खंडणी वसूल केली होती. याबद्दल विक्रेत्याने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. मे महिन्याचा हप्ता देण्यास नकार दिल्याने आकाश परदेशीने त्याच्या दुकानाची तोडफोड केली व सुमारे 90,000 हजार रुपयांचे नुकसान केले. विक्रेत्याला जीवे मारण्याची धमकी देऊन पैसे देण्यासाठी जबरदस्ती केली. आकाश परदेशी हा डोके तालीम येथील रहिवासी आहे. 
        या प्रकरणाची दखल घेऊन फारसखाना  पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रशांत भस्मे यांनी शिवम आंदेकर आणि त्यांच्या पाच साथीदारांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. शिवम आंदेकर व आकाश परदेशीला अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!