संस्थांनी पुरस्काचे प्रस्ताव 20 जून पर्यंत सादर करण्याचे आवाहन- शिक्षण अधिकारी शबनम मुजावर
सातारा: सातारा जिल्हा परिषदेमार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दलित, मागास स्त्रिया, उपेक्षित कष्टकरी वर्गाचे सामाजिक, शैक्षणिक प्रबोधन करणाऱ्या संस्थेस पुरस्कार देऊन सन्मानित करावयाचे आहे. तरी इच्छुक संस्थांनी प्रस्ताव 20 जून पर्यंत सादर करावेत.
संस्थेनी सादर करावयाच्या प्रस्तावाच्या नमुन्याच्या प्रती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्या कार्यालयात उपलब्ध आहेत. संस्थांनी पोलीस अधीक्षक यांचा चारित्र्य दाखला (पोलिस व्हेरिफिकेशन) असणे गरजेचे आहे. संस्थांनी आपले प्रसताव 20 जून पर्यंत शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद, सातारा यांच्या कार्यालयात पाठवावेत. संस्थांची निवड छानणी समितीव्दारे प्रस्ताव तपासून करण्यात येईल, असे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) शबनम मुजावर यांनी कळविले आहे.
