महत्त्वाच्या बातम्या

खासदार लंकेंची माण तालुक्यातील रुग्णास मदत

   अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांनी आपल्या सहकाऱ्याच्या एका शब्दावर माण तालुक्यातील रुग्णास आर्थिक मदत मिळवून दिली. माण तालुक्यातील राजवडी येथील विजय मुगूटराव जगदाळे हे रुबी हॉल पुणे येथे ह्रदयरोगावर उपचार घेत होते. त्या दरम्यान खासदार लंके हे मतदारसंघातील रुग्णांना भेटण्यासाठी रुग्णालयात आले होते. त्याचवेळी खासदार लंके यांचे समर्थक व सातारा सहकार बोर्डाचे माजी संचालक चंद्रकांत जगदाळे ऊर्फ पिंटूशेठ यांनी कामानिमित्त त्यांना फोन केला. मी रुबी हॉल रुग्णालयात आहे असे खासदार लंके यांनी सांगितले असता पिंटूशेठ यांनी त्यांना विजय जगदाळे यांना भेटण्याची विनंती केली. खासदार लंके यांनी सुध्दा ही विनंती मान्य करत विजय जगदाळे यांची भेट घेऊन विचारपूस केली. तसेच आर्थिक मदत मिळवून देण्याचा शब्द दिला.त्यानंतर खासदार लंके यांनी विजय जगदाळे यांना वैद्यकीय उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळवून देण्यासाठी पत्र दिले व पाठपुरावा केला. खासदार लंके यांच्यामुळे विजय जगदाळे यांना वैद्यकीय उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून एक लाख रुपयांची मदत मिळाली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!