महत्त्वाच्या बातम्या

पीएमसी मधील महिला अधिकाऱ्यास धमकावल्या प्रकरणी भाजप नेते ओंकार कदम वर गुन्हा दाखल

     भाजप कामगार विंग शहर अध्यक्ष ओंकार कदम यांच्यावर महिला अधिकाऱ्यास धमकावल्या प्रकरणी व छळ केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील महिला  अधिकाऱ्याला  धमकावणे  आणि त्रास देणे  या कारणास्तव त्यांच्यावर 17 जून रोजी पुण्यातील शिवाजी नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुणे महानगरपालिकेतील आरोग्य विभागातील  महिला  अधिकाऱ्याने तक्रार दाखल केली असून तक्रारीनुसार पीएमसी मध्ये जाऊन ओंकार कदम व त्यांच्या समर्थकांनी महिलेला धमकावत तिच्याकडे नसलेली माहिती मागितली. तिच्या परवानगीविना तिचे व्हिडीओ काढले.
             महिला अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ओंकार कदम हे यापूर्वीही अनेकदा कार्यालयात यायचे.  त्या महिलेशी गैरवर्तन करायचे, असभ्य बोलायचे. त्याच महिलेने तक्रार दाखल केली असून 17 जून रोजी त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.  भाजप नेते ओंकार कदम वर शिवाजी नगर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिताच्या कलम ७८ (पाठलाग), ७९ पीएम (शब्द, हावभाव किंवा कृतींद्वारे महिलेचा विनयभंग करणे), १२६ (चुकीचा प्रतिबंध), १८९(२) (बेकायदेशीर सभा) आणि ३५१(२) (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
         मिळालेल्या  माहिती नुसार ओंकार कदम तसेच त्यांच्या सहकाऱ्यांना  पीएमसी आयुक्तांनी पीएमसीच्या इमारतीमध्ये   येण्यास बंदी घातली होती. तक्रारदार महिलेने अंतर्गत समिती, सुरक्षा विभाग आणि भाजप नेत्यांकडेही तक्रार केली होती. परंतू जेव्हा छळ थांबला नाही तेव्हा तिने अखेर राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली.
        पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, “ओंकार कदम वर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाची चौकशी सुरू आहे; त्यानुसार, कदमवर कारवाई केली जाईल.” असे शिवाजी नगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश बोलकोटगी यांनी एफपीजेशी बोलताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!