पुण्यात वेश्या व्यवसायाच्या नावाखाली सुरु होता हा प्रकार…
पुण्यात कोयता गँग, हिट अँड रन, चोरी या घटना घडत असतानाच आता ड्रग्स रॅकेट बद्दल एक धक्कादायक बाब समोर आली आहे. पुण्यातील बुधवार पेठेत अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या प्रकरणी एका महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.अंमली पदार्थ विरोधी पथकाने या प्रकरणाचा खुलासा केला आहे. पुण्यातील बुधवार पेठेत वेश्या व्यवसायाच्या नावाखाली ड्रग्स तस्करी चालू होती. अटक केलेली आरोपी महिला आक्का या नावाने ओळखली जात होती. तिचे नाव ज्योती सुनिल यादव (वय50 वर्षे )असून ती कात्रजची रहिवासी आहे.
या वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेने अनेक ग्राहकांना मेफेड्रोन पुरवल्याचे आढळल्याने तिला अटक करण्यात आली आहे. सदर आरोपी महिला तिच्या भावासोबत मिळून ड्रग्स ची तस्करी करत होती असे तपासा दरम्यान उघडकीस आले आहे. तिचा भाऊ शरणप्पा कट्टीमणीला पोलिसांनी गुलबर्गा कर्नाटक येथून अटक केली आहे.पुण्यातील बुधवार पेठेत हा सर्व प्रकार चालू होता. शरणप्पा कडे अंदाजे 12.12 लाख रुपयांचे 59 ग्रॅम एमडी आढळले. शरणप्पाने कबुली दिली आहे की, हे ड्रग्स आक्काने पुरवले आहे.
या प्रकरणात पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, डीसीपी निखिल पिंगळे यांच्या आदेशानुसार आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.
