रक्षक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष सुशील दादा मोझर यांचे चिरंजीव वेदांत यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा
रक्षक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष सुशील दादा मोझर यांचे चिरंजीव वेदांत यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला. चिरंजीव वेदांत यांनी जलमंदीर येथे खासदार उदयनराजे भोसले यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी सुशील दादा मोझर यांच्यासह अनेक कायकर्ते उपस्थित होते. खा. उदयनराजे भोसले यांनी चिरंजीव वेदांत यांना परफ्युम बॉटल भेट देत उंदड आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना खासदार उदयनराजे भोसले यांनी खूप शिका व मोठे व्हा, समाजात मानाचे स्थान मिळवा असा मोलाचा सल्ला दिला.
जलमंदिर येथे उदयनराजे भोसले यांची भेट घेण्यासाठी आदमापूर येथून आलेले भाकणूककार कृष्णात डोणे यांचे आशीर्वाद चि वेदात यांनी घेतले. यावेळी चंदन सरकार शरदतात्या काटकर, जितूकाका खानविलकर, पंकज चव्हाण, अमोल तांगडे यांच्यासह रक्षक प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते.
