गजानन राऊत यांचा अक्षदाचार्य समाजभूषण पुरस्काराने गौरव
चंद्रसेन वधू वर सूचक मंडळाचे अध्यक्ष गजानन राऊत यांचा अक्षदाचार्य समजभूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.सपकाळ नवयुग मंडळाच्या वतीने या पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते.गजानन राऊत हे अनेक वर्षांपासून समाजसेवेत सक्रिय राहून काम करत आहेत. याच माध्यमातून आतापर्यंत त्यांनी सर्वसामान्य लोकांना मदत केली आहे. त्याचबरोबर ते १९९५ पासून चंद्रसेन नाभिक वधु वर मंडळाच्या अध्यक्षपदी असल्यामुळे आत्तापर्यंत त्यांच्या माध्यमातून अनेकांची विवाह जुळले आहेत. या सर्व कार्याची दाखल घेत त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
सरपंच सुनिल सपकाळ यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी सपकाळ नवयुवक मंडळाचे अध्यक्ष महेंद्र सपकाळ, सचिव हेमंत सपकाळ, जयवंत सपकाळ, मानसिंग सपकाळ, विजय सपकाळ, मंगेश सपकाळ, शैलेश सपकाळ, दत्तात्रय सपकाळ,पांडुरंग राऊत, सुनिल राऊत आदी मान्यवर उपस्थित होते. या पुरस्काराबद्दल संघटनेचे अध्यक्ष पदाधिकारी व वेटणे ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
