महत्त्वाच्या बातम्या

जिल्हा परिषद चौकातील गटर जाळी धोकादायक स्थितीत

   सातारा शहरातील जिल्हा परिषद चौकातील गटर जाळी धोकादायक स्थितीत असून सातारा नगरपरिषदेने तत्परतेने  लक्ष घालणे गरजेचे आहे. पावसाच्या पाण्याने रस्त्याचे डांबर निघाले असून याठिकाणी भरपूर पाणी साचत आहे. त्यामुळे वाहणांना गटर जाळीचा अंदाज येत नाही व याठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांची स्थिती बिकट झाली असून खड्ड्यांमध्ये भरपूर पाणी साचत आहे त्यामुळे दुचाकी, चारचाकी वाहणांचे टायर यामध्ये रुतून बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हा परिषद चौकात देखील रस्त्याचे डांबर निघाले आहे. यापूर्वी देखील गटाराच्या जाळीचे काम राखडले होते.
          लोकप्रांत न्यूज पुणे यांच्या बातमीची दखल घेत जानेवारी महिन्यामध्ये अनेक दिवसापासून धोकादायक स्थितीत असलेल्या गटर जाळीचे काम पूर्ण करण्यात आले होते परंतू आता या जाळीभोवती असणारे डांबर व  सिमेंट वेगळे झाल्याने जाळीची लोखंडी कडा वाहनांसाठी धोकादायक बनली आहे तर संबंधित प्रशासनाने याची तात्काळ दखल घ्यावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!