महत्त्वाच्या बातम्या

माणमधील तीन वर्षांपासूनचा फरार चंदनचोर अटकेत 

     राणंद (ता. माण)चंदनचोरी प्रकरणी आरोपीस दहिवडी पोलिसांनी मोठ्या शीताफिने अटक केली आहे.सदर गुन्ह्यातील आरोपी सूर्यकांत शंकर खरात रा. खरातवस्ती दहिवडी हा तीन वर्षांपासून फरार होता.  शरद लक्ष्मण चव्हाण राहणार जगदाळे वस्ती रानंद यांच्या बांधावरील चंदनाचे झाड २१ जानेवारी २०२० रोजी चोरीला गेल्याची तक्रार दहिवडी पोलिसांत दिली होती. यानुसार गुन्ह्याचे तपास अंमलदार मल्हारी हांगे यांनी गुन्ह्याचा तपास करून मा. प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी दहिवडी यांचे न्यायालयात दोषारोपपत्र पाठवले होते. यानुसार सदर गुन्ह्यातील आरोपी सूर्यकांत संपत खरात राहणार खरात वस्ती दहिवडी यास ०६ मे २०२२ रोजी दोषी ठरवून एक महिना सश्रम कारावास तसेच पाचशे रुपये दंडाची शिक्षा ठोठाविली होती. परंतु न्यायालयाने शिक्षा सोनावले पासून सदरचा आरोपी हा सुमारे तीन वर्षे फरार होता. वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली दहिवडी पोलीस ठाण्याचे सपोनि दत्तात्रय दराडे यांनी व पोलीस हवालदार विशाल वाघमारे यांनी त्या आरोपीस शोध घेऊन ताब्यात घेतले असून मा. न्यायालयाचे आदेशाप्रमाणे जिल्हा कारागृह सातारा येथे जमा केले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!