महत्त्वाच्या बातम्या

ॲड शिवाजी तरटे यांची म्हसवड अधिकृत वकील संघटनेच्या अध्यक्षपदी निवड

  म्हसवड अधिकृत वकील संघटनेची सन २०२५/२६ करिता पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या त्यामध्ये ऑड. शिवाजी किसन तरटे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.यावेळी उपाध्यक्षपदी ॲड. मासाळ व सचिवपदी ॲड अमित पोळ आणि खजिनदारपदी ॲड. काळेल, सह. खजिनदारपदी ॲड. सरतापे, महिला प्रतिनिधी ॲड सौ. पोळ यांच्या निवडी करण्यात आल्या.

     या निवडीसाठी म्हसवड वकील संघटनेचे सर्व विधिज्ञ समर्थन देऊन नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला. याप्रसंगी सर्व सीनियर वकील प्रामुख्याने उपस्थित होते.सदरची निवडणूक प्रक्रिया ही १ जुलै ते ५ जुलै या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आली होती. पाच दिवसाच्या कालावधीमध्ये ॲड शिवाजी तरटे यांचा अध्यक्षपदासाठी एकमेव अर्ज होता मात्र दुसरा कोणताही अर्ज न आल्यामुळे त्यांना बिनविरोध अध्यक्षपदी विराजमान केले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲड ठेंगील यांनी कामकाज पाहिले 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!