महत्त्वाच्या बातम्या

ओम काकासो जाधव प्रज्ञाशोधमध्ये पाचवा; विस्तार अधिकारी यांच्या वतीने सत्कार

दहिवडी: सातारा जिल्हा प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये माण तालुक्यातून ओम काकासो जाधव याचा पाचवा क्रमांक आल्याबद्दल विस्तार अधिकारी यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा म्हसवड नंबर १ येथील इयत्ता सातवी चा विद्यार्थी ओम काकासो जाधव याचा आज शाळेमध्ये माण पंचायत समितीच्या शिक्षण विस्ताराधिकारी श्रीमती तांबोळी मॅडम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर त्या विद्यार्थ्यास मार्गदर्शन करणारे वर्गशिक्षक जोतिराव सावंत सर व आर.डी.खाडे सर यांचाही सत्कार श्रीमती तांबोळी मॅडम यांच्या हस्ते करण्यात आला.

   यावेळी शाळेचे मुख्याध्यापक आर.डी.खाडे सर ,शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ.अमृता मंडले मॅडम, पालक काकासो जाधव व सर्व शिक्षक स्टाफ सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!