महत्त्वाच्या बातम्या

आदर्श सरपंच दादासाहेब काळे व युवकांनी केली स्मशानभूमीची स्वच्छता

दहिवडी: मान्सूनच्या अचानक झालेल्या आगमनामुळे मे महिन्यातच मुसळधार पाऊस पडून माणगंगा नदीला पूर आला होता.पूराचे पाणी आंधळी स्मशानभूमी मध्ये शिरून चिखल आणि मातीचा थर तयार झाला होता. त्याची सर्व स्वच्छता आदर्श सरपंच दादासाहेब काळे व गावातील युवकांनी करून आदर्श कामगिरी उभा केली. स्मशानभूमीची दुरावस्था झालेला मॅसेज ग्रामपंचायत आंधळी ग्रुपवर पडताच गावातील अनेक युवकांनी एकत्र येत स्मशानभूमीची स्वच्छता करण्याची मोहीम हातात घेतली. आणि सरपंच दादासाहेब काळे यांनी या स्वच्छता मोहिमेसाठी लागणाऱ्या सर्व साहित्याची पूर्तता करून दिली. आणि गावातील युवकांनी कोणताही मतभेद न करता. स्मशानभूमीतील माती चिखल आणि दगड हाताने व झाडूने आणि पाणी मारून स्वच्छ केले. या आदर्श कामगिरीमुळे आंधळीतील युवकांचे पंचक्रोशीतून आभार व्यक्त केले जात आहेत.

        या स्वच्छता मोहिमेमध्ये आदर्श सरपंच दादासाहेब काळे यांच्यासह विकास पवार,भगवान चव्हाण,मल्हारी चव्हाण,संजय काळे,वस्ताद नामदास, सोमा कुंभार, ग्रामसेवक विकास शेंबडे, विशाल काटकर दौलत चिखले अमोल आडके अभिजीत भोसले अजित बोडरे तेजस पवार, संतोष Microwave अशा अनेक युवकांनी स्वच्छता मोहीम राबवली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!