महत्त्वाच्या बातम्या

पैशाचे आमिष दाखवत धर्मांतरासाठी करत होते जबरदस्ती

      पुण्यातील पिंपरी चिंचवडमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धर्मांतर करण्यासाठी एकावर जबरदस्ती केली जात होती. या प्रकरणी दोन जणांसोबत एका अमेरिकन नागरिकावर गुन्हा दाखल झाला आहे. सनी बन्सीलाल दनानी असे तक्रार दाराचे नाव असून त्यांच्यावर ख्रिश्चन धर्म स्विकारण्यासाठी दबाव टाकला जात होता. “तुम्ही येशूला देव म्हणून स्विकाराल तर सुख, शांती, संपत्ती आणि मानसिक स्वास्थ्य मिळेल. इतर सर्व देव-धर्म केवळ कथा आहेत,” सनी दनानी हे पिंपरी कॅम्प येथील वैष्णवी देवी मंदिराच्या जवळ राहतात. शिवाय ख्रिश्चन धर्म स्विकारल्यास त्यांना आर्थिक मदत देखील केली जाईल असे आमिष दाखवण्यात आले.
पिंपरी पोलिसांची कारवाई-
या प्रकरणी पिंपरी दनानी यांनी पिंपरी पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली असून पोलिसांनी तक्रार नोंदवून कारवाईला सुरुवात केली आहे.
कोण कोण  आहेत गुन्ह्यात  सामील ?
पिंपरी पोलिसांकडे दाखल झालेल्या तक्रारीनुसार,  या प्रकरणात अल्पवयीन मुलगाही सहभागी असल्याची माहिती आहे.
 Schaefer Javin Jacob (वय ४१, मूळ राहणार – कॅलिफोर्निया, अमेरिका, सध्या – मुकाई चौकाजवळ, पुणे)
स्टीव्हन विजय कदम (वय ४६, राहणार – उद्यमनगर, अजमेरा, पिंपरी, पुणे) आणि विधी संघर्षित बालकाला त्याच्या आईच्या ताब्यात दिले आहे. तर इतर दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
कोणत्या कलमनुसार झाला गुन्हा दाखल? 
पिंपरी पोलिसांनी आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २९९, ३(५) आणि विदेशी नागरिक कायदा कलम १४ (ब)(क) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तपासादरम्यान पोलिसांनी आरोपींकडून दोन मोबाईल जप्त केले आहेत.या प्रकरणाचा  तपास पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!