महत्त्वाच्या बातम्या

दहिवडी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे नामांतर

दहिवडी:  कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचनालय मुंबई शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय.टी.आय) दहिवडीचे नामकरण “श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,दहिवडी” असे नामांतर ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदारजयकुमार गोरे यांनी फलकाचे अनावरण उद्घाटन करून नामांतर झाल्याचे घोषित केले.

 

       ना.जयकुमार गोरे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.नामांतर कार्यक्रमाची सुरुवात श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. याप्रसंगी श्री सिद्धनाथ पतसंस्थेचे चेअरमन अरुण गोरे भाजपा कार्यकारणी सदस्य डॉ.संदीप दादा पोळ सभापती अतुल जाधव, दहिवडी नगरीच्या विद्यमान नगराध्यक्ष . नीलम अतुल जाधव, भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हा कायदा आघाडी अध्यक्ष एडवोकेट दत्तात्रय हांगे , दहिवडी नगरपंचायत मुख्याधिकारी संदीप घारगे,भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते धीरज दवे,युवानेते सिद्धार्थ गुंडगे, म्हसवडचे माजी नगराध्यक्ष डॉ.वसंत मासाळ, विठ्ठलबापू भोसले, दहिवडीचे मा.नगराध्यक्ष सतीश जाधव, श्री सिद्धनाथ पतसंस्थेचे संचालक दत्तात्रय देशमाने,संदीप जाधव, संजयशेठ शितोळे, आदी मान्यवर व श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था दहिवडीचे सर्व कर्मचारी वर्ग आणि संस्थेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!