प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यास 30 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ
सातारा: जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतक-यांना प्रधानमंत्री योजनेत सहभागी होण्यासाठी 30 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अतिशय अल्प दरामध्ये ही योजना शासनाने सुरु केली असून ती शेतक-यांच्या हिताची असल्याने शेतक-यानी वाढीव मुदतवाढीच्या कालावधीत तात्काळ आपला विमा हप्ता भरुन योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अजय शेंडे यांनी केले आहे.
