महत्त्वाच्या बातम्या

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये स्पर्धा परीक्षांची ओळख व एम.पी.एस.सी. फाउंडेशन बॅच उद्घाटन समारंभ संपन्न

       रयत शिक्षण संस्थेचे, एस.एम. जोशी कॉलेज हडपसर येथील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या वतीने स्पर्धा परीक्षांची ओळख व एम.पी.एस.सी. फाउंडेशन बॅच उद्घाटन समारंभ बुधवार, दि. ६ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १०:०० वा. संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व उद्घाटक हडपसर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरिक्षक अश्विनी जगताप उपस्थित होत्या. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रो.डॉ दिनकर मुरकुटे उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुरेश साळुंखे यांच्या मार्गदर्शनाने स्पर्धा परीक्षांची ओळख व एम.पी.एस.सी. फाउंडेशन बॅच सुरू करण्यात आलेली आहे.

        विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पोलीस निरिक्षक अश्विनी जगताप यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची पंचसूत्री सांगितली. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी व्हायचे असेल तर विद्यार्थ्यांनी आपल्या डोळ्यासमोर निश्चित असे ध्येय ठेवले पाहिजे. विद्यार्थ्यांनी वेळेचे योग्य नियोजन, कठोर परिश्रम व सातत्यपूर्ण अभ्यास केल्यास त्याला स्पर्धा परीक्षेमध्ये निश्चितपणे यश मिळेल. असे मत पोलीस निरिक्षक अश्विनी जगताप यांनी व्यक्त केले. 
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रो.डॉ दिनकर मुरकुटे म्हणाले की, सध्याच्या काळात माहितीची आधुनिक साधने मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झालेले आहेत. विद्यार्थ्यांनी त्या साधनांचा उपयोग करून स्पर्धा परीक्षेला सामोरे गेले पाहिजे. महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या वतीने सुरू करण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांची ओळख व एम.पी.एस.सी. फाउंडेशन बॅचच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभ्यासाची योग्य दिशा मिळेल. तसेच स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी प्रशासकीय सेवेमध्ये  अधिकारी पदावर विराजमान होतील. असे मत उपप्राचार्य प्रो.डॉ दिनकर मुरकुटे यांनी व्यक्त केले. तसेच डॉ.संजय जगताप यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षे संदर्भात मार्गदर्शन केले. 
          कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या चेअरमन डॉ.छाया सकटे यांनी केला. कार्यक्रमाचे आभार समन्वयक प्रा.अजित भोसले यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  प्रा.अमृता मुखेकर आणि प्रा.दिपक गायकवाड यांनी केले. कार्यक्रमासाठी बहुसंख्येने विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!