माणमध्ये अंगणवाडी सेविका भरतीमध्ये घोटाळा
दहिवडी: संपूर्ण देशभरामध्ये अधिकाऱ्यांचा तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माण तालुक्यांमध्ये अंगणवाडी सेविका या पदाच्या भरतीमध्ये अनेक अंगणवाडी सेविकांनी बनावट कागदपत्रे बनविल्याचे माहिती अधिकारामध्ये समोर आले आहे.अशी चर्चा माण तालुक्यातून अनेक गावांमधून ऐकायला मिळत आहे.आई-वडिलांनंतर शैक्षणिक जीवनामध्ये सर्वप्रथम मातेसमान असणाऱी अंगणवाडी सेविका असते. शैक्षणिक आणि संस्काराची सुरुवात अंगणवाडीच्या मॅडम कडूनच होते. मात्र याच अंगणवाडी सेविका बनण्यासाठी अनेक सेविकांनी बनावट कागदपत्रे तयार करून भरती झाल्याचे ऐकायला मिळत आहे.
अंगणवाडी सेविका ही भरती गुणवत्तेवर आधारित राज्य शासनाने घ्यायचे ठरविले. ज्यांची जास्त गुणवत्ता व जास्त कोर्सेस असतील त्यांनाच या भरतीमध्ये प्रथम स्थान होते. म्हणून काही उचापती अंगणवाडी पतीनी बायको सेविका व्हावी म्हणून डी.एड, बी एड, एम ए. पदवीधर असे अनेक खोटी मार्कलिस्ट आणि धाकले तयार पद मिळवले आहे. तालुक्यातील काही गावांमधील नागरिकांनी माहिती अधिकारांमध्ये माहिती मागविले असता. संबंधित महाविद्यालयाने सांगितले आहे की या नावाचा उमेदवार आमच्या महाविद्यालयांमध्ये कधीच नव्हता. त्यामुळे आत्ता बनावट कागदपत्रे तयार करून अंगणवाडी सेविका पद मिळवलेल्यांचे धाबे दनाणले आहेत. काही दिवसातच सर्वांचे पुरावे समोर येतील अशी चर्चा जनतेतून आहे.
