महत्त्वाच्या बातम्या

राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्यानिमित्त  जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयाकडून शिबीरांचे आयोजन

सातारा:  राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्याचे १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर  या कालावधीमध्ये आयोजन करण्यात आले आहे. जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सातारा या कार्यालयामार्फत विविध शिबीरांचे व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.सर्व मागासवर्गीय, भटक्या जमाती, विमुक्त जाती, इतर मागासवर्ग, विशेष मागासप्रवर्ग व सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास  प्रवर्गातील पालकांनी आपल्या पाल्याचे जात वैधता प्रमाणपत्र त्यांच्या इयत्ता ११ वी व १२ वी विज्ञान अभ्यासक्रम व पदविका (तृतीय वर्ष अभ्यासक्रमात) शिकत असताना प्राप्त करण्याकामी योग्य कागदपत्रांसह परिपुर्ण प्रस्ताव तयार करून आपल्या विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयांच्या प्राचार्यांच्या मार्फत समितीस   सादर करावेत, असे आवाहन जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य उमेश घुले यांनी केले आहे.

       ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी समितीस प्रस्ताव सादर केले आहेत परंतु अद्याप त्रुटींची पुर्तता केली नसल्याने प्रकरण प्रलंबित आहे अशा सर्व त्रुटीयुक्त प्रस्तावधारक यांनी समिती कार्यालयास सर्व आवश्यक मुळ कागदपत्रांसह दि. २२ सप्टेंबर ते दि. २६ सप्टेंबर २०२५ या कालावधीमध्ये समक्ष उपस्थित राहून त्रुटींची पुर्तता करावी जेणेकरून समितीस आपले प्रस्तावावर विहित कालमर्यादेत कागदोपत्री पुराव्यांच्या गुणवत्तेनुसार निर्णय घेता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!