महत्त्वाच्या बातम्या

रामोशी समाजाचे उपोषण स्थगित; मंत्री जयकुमार गोरेंच्या हस्ते सोडले उपोषण 

दहिवडी:  रामोशी समाजाला एसटी आरक्षण मिळावे यासाठी परिवर्तन संघाचे अध्यक्ष संजयनाना जाधव व रवी नाईक यांनी २५ सप्टेंबर पासून सुरू केलेले साखळी उपोषण ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिलेल्या लेखी आश्वासन नंतर आज उपोषण सोडण्यात आले. मूळचे आदिवासी असलेल्या बेरड रामोशी समाजाला एसटी आरक्षण मिळावे यासाठी उपोषणाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपल्या सर्व मांडून आरक्षण मिळावे यासाठी प्रयत्नशिल राहीन असे आव्हान मंत्री जयकुमार गोरे यांनी केले.

         पुढे बोलताना जयकुमार गोरे म्हणाले की रामोशी समाज हा शब्दाला जागणारा समाज आहे. मी चारवेळा आमदार झालो याच्यामध्ये रामोशी समाजाचा खूप मोठा वाटा आहे.या समाजाने आतापर्यंत माझ्यावर भरभरून प्रेम केले आहे.म्हणून मी माझ्या राजकीय सुरुवातीला रामोशी समाजाचे जगन्नाथ जाधव गुरुजी यांना पंचायत समितीला उमेदवारी देऊन निवडून आणून सभापती पदावर बसविले. छत्रपती शिवरायांसोबत सर्वात जास्त सैनिक रामोशी समाजाचे असल्यामुळे स्वराज्य मिळविण्यात या समाजाचा मोठा वाटा आहे. शिवरायांचे अत्यंत महत्वाचे गुप्तहेर खाते याच समाजाचे बहिर्जी नाईक होते. माझ्या राजकीय जडणघडणीमध्ये या समाजाने मला खूप मोठे योगदान दिले आहे. म्हणून या समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मी शिष्ट मंडळाला मुख्यमंत्री यांची भेट घडवून सर्वोत्तोपरी प्रयत्न करेन असे आवाहन ना.जयकुमार गोरे यांनी केले. यावेळी शेकडो रामोशी समाज बांधवांसह जय मल्हार क्रांती संघटनेचे अध्यक्ष दौलत नाना शितोळे, सुरेश गस्ती वकील,पोपटराव खोमणे, सुनील जाधव, एम एम मदने, रामदास धनवटे, इत्यादी उपस्थित होते.

       देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी रामोशी समाजाचा फार मोठा वाटा आहे. या समाजाला आतापर्यंतच्या सर्व सरकारने आश्वासनावरती ठेवले आहे. परंतु नामदार जयकुमार गोरे यांच्यावरती आमचा फार मोठा विश्वास आहे आमचा त्यांच्यावर अधिकार आहे. आमचा समाज त्यांच्या पाठीशी कायम राहिला आहे. म्हणून मंत्री गोरे यांनी समाजाच्या भावना शासन दरबारी मांडून समाजाला न्याय द्यावा. अशी प्रतिक्रिया उपोषणकर्ते संजयनाना जाधव यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!