महत्त्वाच्या बातम्या

पालकमंत्री देसाई यांचा अनवाणी अतिवृष्टी पाहणी दौरा

दहिवडी: माण तालुक्यात नुकतीच अतिवृष्टी झाली. जोरदार झालेल्या पावसामुळे शेतामधील पिकाचे तसेच अनेक व्यावसायिकांचे अतोनात नुकसान झाले. आपत्तीग्रस्तांना दिलासा देण्यासाठी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई यांनी नवरात्र चे उपास असताना देखील पायात चप्पल न घालता अनवाणी स्वरूपात केलेला दौरा राज्य प्रशासनाचा आदर्श नमुना ठरला असून राजकारणातील जाणकार मान्यवरांनी पालकमंत्र्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. दिनांक 26 व 27 सप्टेंबर रोजी माण तालुक्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई यांनी प्रशासकीय लव्याजम्यांसह नुकसानग्रस्त शेतीच्या ठिकाणी जाऊन तसेच व्यवसायिक, व्यापारी यांच्या आपत्तीग्रस्त ठिकाणी जाऊन समक्ष पाहणी केली. नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाला दिले.

           पिंगळी गावच्या हद्दीतील अतिवृष्टीमुळे पूर्णपणे वाया गेलेला कोबी भाजीपाल्याचा प्लॉट , आदर्श गाव लोधवडे येथील माजी सरपंच शामराव पवार तसेच प्रताप पवार यांचा केळीचा कुजण्याच्या अवस्थेत असणारा प्लॉट , तसेच पिंपरी येथील राजगे यांच्या सढण्याच्या अवस्थेत असणाऱ्या कांद्याच्या प्लॉटला पालकमंत्री यांनी भेट देऊन प्राप्त परिस्थितीची पाहणी केली.

 म्हसवड शहरातील पुराच्या पाण्यामुळे झालेले व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान याबाबत नामदार देसाई यांनी नियम शिथिल करून पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. म्हसवड येथील सातारा पंढरपूर महामार्गावरील दुतर्फा गटार बांधकामाबद्दल स्थानिकांनी रोष व्यक्त करताच राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळ पुणे कार्यालयातील अधिकाऱ्याला फोन लावून ऑन द स्पॉट त्याची कान उघडणे केली.

         या सर्व पहाणी दौऱ्यापूर्वी व तालुक्यात मंत्री महोदयांचा आगमन होण्यापूर्वी प्रांताधिकारी, तहसीलदार, कृषी अधिकारी तसेच शिवसेनेचे पदाधिकारी एकच चर्चा करीत होते.

 पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई यांचे नवरात्रीचे सलग उपवास, त्यामुळे शारीरिक अशक्तपणा, याबरोबरच मंत्री महोदयाच्या पायात चप्पल नाही, त्यांना अनवाणी किती दूरपर्यंत चालवायचे याबाबत प्रशासकीय अधिकारी भीतीयुक्त संभ्रमात होते . मुख्य रस्त्यापासून काट्याकुट्यातून, गवत व झुडपातून त्यांना चालत शेताच्या बांध व नुकसानग्रस्त पिकापर्यंत न्यायचे कसे ?

          मात्र हाडाचा शेतकरी व तळागाळातील जनतेशी घट्ट नाळ असणारा भूमिपुत्र मंत्री शंभूराज देसाई यांनी स्थानिक शिवसेना पदाधिकारी व प्रशासकीय अधिकाऱ्याचा अंदाज फोल ठरविला. मुख्य रस्त्यावरून लाल दिव्याच्या गाडीतून खाली उतरताच पिंगळी, लोधवडे, पिंपरी येथील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत नामदार शंभूराज देसाई नेहमीच्याच उमेदीत व उत्साहात बाधित शेतीत गेले व संबंधित शेतकऱ्याची आपुलकीने चर्चा करून शासन तुमच्या पाठीशी आहे ,घाबरू नका, नुकसानीचे पंचनामे करून घ्या. दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई देण्याचा प्रयत्न राहील असा दिलासा त्यांनी शेतकऱ्यांना दिला. म्हसवड येथील मुख्य ठिकाण शिं गणापूर चौक ते बस स्थानक हे अंतर अक्षरशः पायाला खडे टोचत असताना सुद्धा मंत्री महोदयांनी त्याकडे दुर्लक्ष केले. उद्दिष्ट एकच होते अडचणीत असणाऱ्याला मदत करायची. शिवसेनेचे मुख्य नेते, खऱ्या अर्थाने जाणता राजा, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या पावलावर पाऊल ठेवून शिवसेनेचा सच्चा नेता कसा असावा याचा योगायोग माण तालुक्यातील दौऱ्याच्या वेळी नामदार शंभूराज देसाई यांच्याकडून दिसून आला. म्हसवड येथील माण गंगा नदीवरील पुलाचे उद्घाटन तात्कालीन मंत्री व माननीय शंभुराज देसाई यांचे आजोबा स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांनी केल्याचे उपस्थित मधील वयोवृद्ध लोकांनी सांगितले व जुन्या आठवणींना उजाळा करून दिला.आजोबाच्या पावलावर पाऊल ठेवून मंत्री शंभूराज यांनी माण तालुक्याचा नुकसानग्रस्त पीक पाहणी दौरा केल्याबद्दल अनेकांनी समाधान व्यक्त केले. या दौऱ्यात शिवसेना शेतकरी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर, शिवसेना तालुका अध्यक्ष बाळासाहेब मुलानी, म्हसवड शहराध्यक्ष वैभव गुरव, पंत मंडले , हनुमंत राजगे, अनिल मासाळ,सुभाष काळुंगे,अंकुश नलवडे इत्यादी शिवसेना पदाधिकारी सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!