नाकाबंदी असताना 138 कोटींचे सोने भरलेला ट्रक पोलिसांच्या तावडीत
पुणे – आगामी विधानसभेच्या निवडणूकीच्या गोंधळात पुण्यात आज एक खळबळजनक बाब निदर्शनास आली. पुण्यातील सातारा रस्त्यावर एक ट्रक नाकाबंदी करणाऱ्या पोलिसांनी पकडला. या संशयित वाहणाची पोलिसांनी झडती घेतली असता त्यामध्ये तब्ब्ल 138 कोटी रुपयांचे सोने सापडले असल्याची माहिती समोर येत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असताना हा सोन्याने भरलेला ट्रक कोणाचा आहे ? तो कोठून आला ? या सगळ्याचा तापास पुणे पोलीस करत आहेत. हे कोट्यावधी रुपयांचे सोने पोलिसांनी जप्त केले आहे.
