महत्त्वाच्या बातम्या

शशिकांत शिंदे यांचा स्वराज मंगल कार्यालय येथे संवाद मेळावा संपन्न

 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र पवार गटाचे व सातारा कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार मा आमदार शशिकांत शिंदे यांनी आज स्वराज मंगल कार्यालय येथे संवाद मेळाव्याचे आयोजन केले होते. सदर मेळाव्यास कोरेगाव ,म्हाउली  ,क्षेत्र म्हाउली,  वनवासवाडी,प्रतापसिंह नगर ,तसेच खेड येथील कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती.
यावेळी आमदार महेश शिंदे यांच्या गटातील शेकडो कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटामध्ये जाहीर प्रवेश केला. या सर्व कार्यकर्त्यांचा मा.आमदार शशिकांत शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी क्षेत्र म्हाउली  येथील भाजपाचे पंचायत समिती सदस्य सौ.रंजना जाधव सरपंच सौ नूतन सावंत, उपसरपंच सत्यवान जाधव, सदस्य सौ अंजली निकम व सौ छाया तुपे यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट मध्ये जाहीर प्रवेश केला.
याप्रसंगी बोलताना आमदार शशिकांत शिंदे यांनी सांगितले की,ज्या व्यक्ती तत्त्वाने वागतात आपला स्वाभिमान विकत नाहीत अशा व्यक्तींच्या स्वाभिमानाचा आज सत्कार केला जातोय. त्यांना आमच्या पक्षात योग्य तो मान सन्मान दिला जाईल. तसेच याप्रसंगी बोलताना मा.आमदार शशिकांत शिंदे यांनी आमदार महेश शिंदे यांच्यावर कडाडून टीका केली .प्रताप सिंहनगर येथील पाणी प्रश्न रस्ते गटार समाज मंदिर शाळा यासारखे अनेक प्रश्न आपण मार्गी लावली. त्याचबरोबर सातारा येथे मेडिकल कॉलेज आणण्यात आमच्या पक्षाचा सिंहाचा वाटा होता असे त्यांनी सांगितले. तसेच सध्या खेड ग्रामपंचायतीचा कारभार विद्यमान आमदारांचे स्वीय सहाय्यक हेच कारभार चालवत असल्याने कोरेगाव मतदारसंघांमध्ये असलेले हुकूमशाही व दडपशाही उलथून टाकण्यासाठी मला निवडून द्यावे असे आव्हान त्यांनी उपस्थितांना केले.
या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते कामेश कांबळे युवा नेते संतोष भाऊ जाधव सुशील दादा मोझर खेड ग्रामपंचायत सदस्य निखिल यादव व शेलार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!