महत्त्वाच्या बातम्या

माण पंचायत समिती सभापतीसाठी खुले

दहिवडी: माण पंचायत समिती सभापती पदाची आज सोडत झाली असून सभापती पद खुले झाले आहे त्यामुळे तालुक्यात अनेक दिवसाची असलेली सुप्त इच्छा आता पूर्ण होणार आहे. निवडणुकीसाठी इच्छुकांची भाऊ गर्दी पाहायला मिळणार आहे.

 तालुक्यात पाच जिल्हा परिषद गट व दहा पंचायत समिती गण आहेत यामध्ये आरक्षण कोणत्या गटावर खुले होते त्यावर इच्छुकांची मनसुबे तयार होणार आहेत सध्या तरी आंधळी गटातून परकंदीचे माजी सरपंच बाळासाहेब कदम ,कासारवाडी येथील किसन सस्ते भाजपचे दहिवडी मंडल अध्यक्ष गणेश सत्रे , योगेश घाडगे हे प्रमुख दावेदार असून शेखर गोरे यांचे समर्थक कुमार मगर,वसंत दत्ता घाडगे तर राष्ट्रवादीकडून गणेश जगदाळे, सुनील सूर्यवंशी, प्रभाकर खांडे यांच्या नावाची चर्चा होऊ शकते 

बिदाल गटातून नामदार गोरे यांचे विश्वासू प्रताप भोसले, बाळासाहेब जगदाळे, हरिभाऊ जगदाळे पैलवान प्रमोद जगदाळे उद्योजक प्रकाश जगदाळे यांच्या नावाचा विचार होऊ शकतो तर विरोधक मधून तानाजी मगर, पिंटू जगदाळे, योगेश भोसले, विजय भोसले, विकास निंबाळकर, हे चेहरे असणार आहेत 

मार्डी गटातून माझी पंचायत समिती सदस्य राज पोळ व बाजार समितीचे सभापती विलास देशमुख भाजपकडून असून पोळ परिवाराचे विश्वासू अनुभवी माजी सभापती श्रीराम पाटील हे प्रमुख दावेदार असणार आहेत. गोंदवले गटातून माजी सरपंच विष्णुपंत कट्टे, अंगराज कट्टे, बाळासाहेब माने,  तर कुकुडवाड गटातून कुकुडवाडचे माजी सदस्य उत्तम काटकर, देवापुरचे सरपंच शहाजी बाबर,भागवत अनुसे, बनगरवाडीचे सरपंच विक्रम शिंगाडे,यांना मिळू शकते 

      याशिवाय गणातील सोडतीमध्ये आरक्षण खुले न पडल्यास अर्जुन काळे, विकास शिंगाडे, नितीन आप्पा राजगे, अड. दत्ता हंगे, दादा मडके, यांनाही दैवाची साथ मिळू शकते. सध्या तरी इच्छुकांची संख्या मोठी असली तरी गणाचे आरक्षण पडल्यानंतर यापैकी अनेक इच्छुकांना मुरुड घालावी लागणार आहे त्यामुळे नेमकं कोणाला संधी मिळेल यासाठी गणाच्या सोडतीवर लक्ष राहणार आहे त्यानंतरच बऱ्यापैकी चित्र स्पष्ट होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!