महत्त्वाच्या बातम्या

माणमध्ये गोरे, पोळ जाऊ बाईना संधी… कुकूडवाडमध्ये  मात्तबरांची लढाई तर  गोंदवलेमध्ये अनेकांच्या गुढग्याचे बाशिंग सुटले  

दहिवडी: माण तालुक्यात आज पंचायत समिती गणाचे व जिल्हा परिषद गटाचे आरक्षण जाहीर झाले. या आरक्षण सोडती नंतर अनेकांचा हिरमोड तर अनेकांना उकळ्या फुटल्याचे आज स्पष्ट झाले. आंधळी गटामधील दोन्ही गणात तर वावरहिरे व वरकुटे मलवडी गणात सभापती पदाची खुर्ची खुणावत आहे. गोंदवलेकर यांचा मात्र मोठा हिरमोड पाहायला मिळाला. गेले वेळी कै. सदाशिवराव पोळ यांच्या दोन्ही सुना जिल्हा परिषदेच्या गोंदवले व मार्डी गटातून निवडून आल्या होत्या. यावेळी ती संधी गोरे कुटुंबाला आली असून जाऊ बाई जिल्हा परिषदेमध्ये दिसणार का हे पहावे लागेल. आंधळी व बिदाल हे दोन्ही जिल्हा परिषद गट महिलांसाठी खुले असल्याने सोनल गोरे, सोनिया गोरे या दोन्ही महिलांनी संधी आहे.

        आंधळी गटात प्रभाकर देशमुख यांना मानणारे कार्यकर्ते आहेत. राष्ट्रवादीची ताकद बऱ्यापैकी आहे. या ठिकाणी सामान्य चेहऱ्याला संधी मिळू शकते तर आंधळी व मलवडी दोन्ही गल खुले झाले असल्यामुळे व सभापती पद खुले असल्याने या ठिकाणी इच्छुकांची संख्या मोठी राहणार आहे. सध्या तरी परकंदीचे सरपंच बाळासाहेब कदम, भाजपचे अध्यक्ष गणेश सत्रे हे दोन चेहरे प्रभावीपणे समोर येत आहेत तर विरोधी गटातून, गणेश जगदाळे, सुनील सूर्यवंशी, श्रीकांत जगदाळे इच्छुक असणार आहेत. 

 आंधळी गटातून जिल्हा परिषदेसाठी या अगोदरच सोनल गोरे यांचे नाव चर्चेत होते. आजच्या आरक्षणामुळे आणखी या नावाला बळकटी मिळाली आहे. बिदाल गट महिलांसाठी खुला असलेले या ठिकाणी सोनिया गोरे यांना मोठी संधी आहे. गणातही महिलांसाठी खुला झाल्याने येते उमेदवारी कोणाच्या वाट्याला येणार ते पहावे लागेल. वावर हिरे खुला असल्याने इच्छुकांची संख्या मोठी असणार आहे. मार्डी जिल्हा परिषद गट महिलांसाठी खुला असल्याने सोनाली पोळ यांना पुन्हा उभे राहण्याचे संधी मिळाली आ.हे डॉक्टर भारती पोळ इच्छुक असणार आहेत. मार्डी गण महिलांसाठी खुला असल्याने येथे नाराजाची समजूत काढता येणार आहे तर वरकुटे मसवड या ठिकाणी ओबीसी महिला म्हणून लतिका विरकर यांना पुन्हा उभी राहण्याची संधी मिळणार आहे.

कुकडवाड गटात मात्र खुला असल्याने रथी महारथी यावेळी निवडणूक रिंगणात असणार आहेत. या ठिकाणी चिन्मय कुलकर्णी, अभय जगताप, अनिल देसाई, यांना आयती संधी चालून आली आहे तर वरकुटे मलवडी गणामध्ये आरक्षण खुले असल्याने सभापती पदाला संधी मिळणार आहे. 

         गोंदवले गटामध्ये दोन्हीही गट अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने या ठिकाणी चंद्रकांत शिलवंत, रविकांत तुपे यांची उमेदवारी निश्चित मानली जाते तर त्यांच्या विरोधात भाजपमधून नवख्या चेहऱ्याला संधी मिळणार आहे. पळशी गनातून डॉक्टर राजेंद्र खाडे एडवोकेट दत्तात्रय हंगे बाळासाहेब खाडे ,नितीन आप्पा राजगे हे उमेदवार असू शकतात. आजच्या सोडती मध्ये अनेकांचा हिरमोड झाला असून मी नाहीतर सौ असाही काही नेत्यांचा सूर पाहायला मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!