महत्त्वाच्या बातम्या

कुळकजाईच्या हद्दीत नग्नावस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ

दहिवडी: कुळकजाई (ता. माण) गावच्या हद्दीत महारकी नावाच्या शिवारात एका व्यक्तीस अज्ञाताने डोक्यात गंभीर मारहाण करून जीवे मारून नग्नावस्थेत शेतात फेकून दिल्याची धक्कादायक घटना घडल्याने माण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

        याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या  सविस्तर माहितीनुसार  रमेश मारुती इंगळे वय अंदाजे – ५३ वर्षे हे मंगळवारी (दि.०४) रोजी रात्री १० वाजेपर्यंत कुळकजाई गावातच होते. त्यानंतर घरी जायचे म्हणून गावातून निघाले मात्र ते घरी पोहचलेच नाहीत. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी (दि.०५) रोजी दुपारी साडेतीन वाजता दिलीप एकनाथ घाडगे हे आपल्या शेतात कामानिमित्त आले असता त्यांना शेतात मृतदेह नग्नावस्थेत पडलेला आढळून आला. यानंतर कुळकजाईच्या पोलीस पाटलांना कळवले. पोलीस पाटील घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी दहिवडी पोलिसांना ही घटना कळवली. दरम्यान कुळकजाई आणि पंचक्रोशीतील लोकांनी घटनास्थळी गर्दी केली. स्थानिकांनी मृतदेह पाहिल्यानंतर तो रमेश इंगळे यांचाच असल्याची खात्री पटली. घटनास्थळी दहिवडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे आणि त्यांचे सहकारी पोहचल्यानंतर त्यांनी मृतदेह शवविच्छेदनसाठी पाठवून दिला. यानंतर घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर याबाबत अधिक तपास दहिवडी पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!