महत्त्वाच्या बातम्या

शिवाजीराव महानवर यांना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार जाहीर

दहिवडी: श्री गाडगे महाराज मिशनचे संचालक, येळेवाडी-बिजवडी शैक्षणिक संकुलाचे प्रमुख शिवाजीराव महानवर सर यांना डीएसपी न्यूज चँनेलचा राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार जाहीर झाला असून आज रविवार दि.8 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता वडूज ता.खटाव येथे खा.उदयनराजे भोसले, ग्रामविकास मंत्री ना.जयकुमार गोरे,कृषीमंत्री ना.दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण केला जाणार आहे.

      शिवाजीराव महानवर हे समाजातील निराधार, निराश्रीत दुर्बल,गोर गरीब व शिक्षणापासून वंचीत असणाऱ्या मुला- मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांचा सर्वांगिण विकास करण्यासाठी अहोरात्र झटत आहेत. येळेवाडी सारख्या दुर्गम व दळणवळणापासून वंचीत असलेल्या या खेडेगांवामध्ये विमुक्त जाती व भटक्या जमाती मुला-मुलींसाठी श्री गाडगे महाराज मिशन, मुंबई या संस्थेच्या माध्यमातून आश्रमशाळेची स्थापना केली.तसेच समाजातील अनु. जातीच्या मुला मुलींच्या सर्वांगिण विकासासाठी व मोफत शिक्षणाची सोय व्हावी या हेतूने श्री संत गाडगे महाराज केंद्रीय अनु.जाती निवासी प्राथमिक / माध्यमिक विद्यालय, बिजवडी या विद्यालयाची स्थापना करून शेकडो मुलांमुलींना ते ज्ञानदान देत आहेत.

      शैक्षणिक कार्याबरोबरच एक सामाजिक बांधीलकी म्हणून येळेवाडी या खेडयाच्या विकासाच्या दृष्टीने सरपंच,उपसरपंच,सदस्य या पदावर 15 वर्षे काम गावच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केलेत.त्यांच्या या कार्यामुळे त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!