कोथरूड गोळीबार प्रकरणातील निलेश घायवळ टोळीचा म्होरक्या जेरबंद
पुणे शहर पोलिसांच्या खंडणीविरोधी युनिट १ ने कोथरूड गोळीबार प्रकरणात सहभागी असलेल्या नीलेश घायवळ टोळीतील एका प्रमुख सदस्याला अटक केली आहे. जयेश हा गुन्हा दाखल झाल्यावर अनेक दिवसांपासून फरार होता आणि नंतर कोथरूड प्रकरणाशी संबंधित त्याच्याविरुद्ध MCOCA लागू करण्यात आला. निलेश घायवळ प्रकरणातील साथीदार आरोपी जयेश कृष्णा वाघ याचा तपास सुरू होता दिनांक 7 नोव्हेंबर रोजी खंडणी विरोधी पथक 1 गुन्हे शाखा, पुणे शहर कडील पोलीस अंमलदार राजेंद्र लांडगे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती की, कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता कलम 109,351,352,189,190 व कलम 3 (25) अन्वये गुन्हा दाखल झालेला व फरार झालेला जयेश (वय 36) राहणार 44 विठ्ठल मंदिरासमोर केळेवाडी, कोथरूड पुणे हा कोंडारी गाव टिटवाळा कल्याण तालुका पोलीस स्टेशन जिल्हा ठाणे या भागामध्ये आपली ओळख लपून राहत आहे. बातमी लागताच सदर पोलीस पथक यांनी संबंधित ठिकाणी जाऊन आरोपीचा शोध घेतला व आरोपीस ताब्यात घेतले. ही कारवाई मा. अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे शाखा, पुणे शहर, पंकज देशमुख, मा. पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा, पुणे शहर, निखिल पिंगळे, मा. सहायक पोलीस आयुक्त 1, गुन्हे शाखा, पुणे शहर, विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक 1 गुन्हे शाखेकडील मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती अश्विनी जगताप यांच्या सूचनेप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माळेगावे, पोलीस अंमलदार अमोल आव्हाड, राजेंद्र लांडगे, सयाजी चव्हाण, नितीन कांबळे, अमर पवार, नितीन बोराटे, तसेच युनिट दोन कडील पोलीस अंमलदार अविनाश कोंडे, बबलू मांढरे व नागेश राख यांनी केली.
