महत्त्वाच्या बातम्या

मेट्रो मध्ये प्री वेडींग शूट करणं भोवलं… जोडप्यावर होणार कारवाई

 गेल्या काही काळात  प्री वेडिंग फोटो शूटचा ट्रेंड प्रचंड वाढला आहे. पण अनेकदा काही कपल अशी ठिकाणी फोटो शूट करतात, ज्यामुळे त्यांना फटका बसतो. पुण्यातील एका कपलला देखील त्यांचे प्री वेडींग शूट भोवले आहे.मेट्रो मध्ये विनापरवानगी फोटो शूट केल्याने आता या जोडप्यावर कारवाई केली जाणार आहे.
     सध्या सर्वत्र लग्नाचा सीझन चालू आहे. यामुळे अनेक कपल लग्नाआधी प्री वेडिंग शूट करुन घेत आहे.या कपलने पुण्यातील विविध मेट्रो स्टेशनवर आणि मेट्रोमध्ये फोटो शूट केले आहे. परंतु त्यांच्यावर मेट्रो प्रशासनाकडून मेट्रोच्या नियमांचे उल्लंघन केल्याच्या अंतर्गत कपलवर कारवाई करण्यात आली आहे
 या जोडप्याने फोटो शूट साठी कोणतीही परवानगी घेतली नव्हती 
 मेट्रो रेल्वे च्या कर्मचाऱ्यांनी देखील त्यांना फोटो शूट न करण्याचे बजावले होते परंतु त्यांनी कोणाचेही ऐकले नाही. यामुळे मेट्रो प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि शिस्त राखण्यासाठी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल.  त्याचप्रमाणे तांत्रिक व व्यावसायिक फोटो शूट साठी मेट्रो प्रशासनाची परवानगी घेणे आवश्यक असल्याचे मेट्रो प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!