महत्त्वाच्या बातम्या

बीटस्तरीय क्रीडा स्पर्धेत पांगरीची वेदा गायकवाड प्रथम 

दहिवडी: बीटस्तरीय क्रीडा स्पर्धेत जिल्हा परिषद पांगरी शाळेची वेदा गायकवाड हिने प्रथम क्रमांक पटकाविला. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण बाल क्रीडा स्पर्धा दहिवडी येथे पार पडल्या. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण बीटस्तरीय बाल क्रीडा स्पर्धेचे आयोजन दहिवडी येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत दहिवडी,बिजवडी, महिमानगड या केंद्रातील एकूण 40 शाळा सहभागी झाल्या होत्या. 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेत नव विद्यार्थीनी सहभाग घेतला. यामध्ये पांगरी शाळेची वेदा गायकवाड हिने प्रथम क्रमांक पटकाविला. तिची तालुकास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तिच्या यशाबद्दल पांगरी जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक व पांगरी ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!