महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात टिपू पठाण टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई

       पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. अनेक टोळ्यांनी पुण्यात दहशत माजवली आहे. यातच आता टिपू पठाणच्या विरोधात पोलिसांनी मकोका अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. टिपू पठाण हा गुन्हेगार म्हणून रेकॉर्डवर आहे आणि त्याच्याविरुद्ध विविध पोलिस ठाण्यात २५ विविध गुन्हेगारी गुन्हे दाखल आहे. 

       पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर-कोंढवा परिसरात खंडणी, दरोडा, हल्ला आणि दहशत निर्माण करणे यासारख्या अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपाखाली काळेपडळ पोलिसांनी कुख्यात गुन्हेगार रिजवान उर्फ ​​टिपू पठाण आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मकोका) कडक कारवाई सुरू केली आहे.
अधिकाऱ्यांच्या मते, या वर्षी ऑक्टोबरमध्ये हडपसरमधील सय्यदनगर परिसरात खंडणीच्या गुन्ह्याप्रकरणी पठाण आणि त्याच्या बारा साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.               मुंबईतील 31 वर्षे महिलेने काळेपडळ पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवली आहे. यामध्ये हडपसर येथील सय्यद नगर मधील तिच्या मालकीच्या जागेवर सय्यद पठाण याने कब्जा केला व त्याच्या साथीदारांसोबत मिळून टीन शेड बांधले व ते भाड्याने दिले. बेकायदेशीरपणे बळकावलेल्या जागेबद्दल जेव्हा महिलेचा आणि टिपू पठाण याचा सामना झाला तेव्हा त्याने तिच्याकडे 25 लाख रुपयांची मागणी केली व पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देखील दिली. रिजवान उर्फ टिपू पठाण वय 34 वर्ष  हा मोहम्मद वाडी चा रहिवासी आहे. पठाण आणि त्याच्या टोळीतील अनेक सदस्य सध्या तुरुंगात आहेत. गेल्या काही वर्षांत पठाणवर  खून, खुनाचा प्रयत्न आणि खंडणीसह सुमारे  ३० गंभीर गुन्हे दाखल आहेत . संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी  आणि टिपू पठाण टोळीच्या शहरातील कारवाया मोडून काढण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरु आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!