महत्त्वाच्या बातम्या

दारूच्या नशेत अपंगाला दिली धडक ;चालकाचा ‘मी पोलिसांचा मुलगा आहे मला मारू नका’ असा आरडा ओरडा

     पुण्यात रस्ते अपघाताचे प्रमाण अत्यंत वाढले असून आता. रस्त्यावर वाहने चालवणे देखील असुरक्षित वाटू लागले आहे. यातच  पुण्यातील नारायण पेठेत एक धक्कादायक अपघात झाला त्यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये देखील चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्री उशिरा दारूच्या नशेत असणाऱ्या एका तरुणांच्या गटाने रस्त्यावरील चालत असणाऱ्या अपंगाला धडक दिली. यामध्ये अपंग व्यक्ती जखमी झाला असून त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले व चालकासह इतरांना देखील चौकशी साठी ताब्यात घेतले आहे.
    अपघातानंतर आजूबाजूच्या परिसरातील लोक घटनास्थळी धावले व दारूच्या नशेत गाडी चालवणाऱ्यास गाडीच्या बाहेर ओढून काढू लागले. गाडी चालक हा मी पोलिसाचा मुलगा आहे मला हात लावू नका असा ओरडला. त्यानंतर जमाव संताप्त झाला व त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर घटनास्थळी पोलीस पोहचल्यावर परिस्थिती आटोक्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!