पुण्याच्या बुधवार पेठेतील तरुणीने 9 मजल्यावरून उडी मारून संपवले जीवन
पुणे: पुण्यातील बुधवार पेठ परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 19 वर्षीय तरुणीने आपले जीवन संपवले आहे. काल गुरुवारी दि. 27 रोजी सायंकाळी एक धक्कादायक घटना घडली. संध्याकाळच्या सुमारास एका तरुणीने ९ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. संबंधित तरुणीने इमारतीच्या नवव्या मजल्यावरून उडी घेत आपलं जीवन संपवलं होतं. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. तिने असं टोकाचं पाऊल का उचलल असेल याचा पोलिसांनी तपास सुरु केला. पोलिसांनी या पीडित तरुणीची ओळख पटवली आहे. तिने टोकाचं पाऊल उचलण्याआधी लिहिलेली सुसाईड नोट देखील पोलिसांना सापडली आहे.
तरुणीने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या नोटमध्ये म्हटलं की, “मी घरातल्या लोकांच्या योग्यतेची नाही. मला या कामाचा कंटाळा आल्याने स्वतःहून हे टोकाचे पाऊल उचलून आत्महत्या करीत आहे.” संबंधित तरुणीचे नाव मानसी आहे. ती 19 वर्षांची होती. मागील काही दिवसांपासून याच इमारतीमध्ये वास्तव्याला होती. गुरुवारी सायंकाळी अचानक तिने टोकाचं पाऊल उचललं आहे. या घटनेनंतर परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. तसेच तिच्या मृत्यूमुळे तेथील व्यक्ती हळहळ व्यक्त करत आहेत. दरम्यान या घटनेचा पुढील तपास विश्रामबाग पोलीस करत आहेत.
