ऑक्टोबर हिट नंतर देखील परतीच्या पावसाची शक्यता कायम
ऑक्टोबर हिट चा चटका जाणवत असताना देखील मुंबईत पहिल्या दोन आठवड्यात ऊन पावसाचा खेळ पाहायला मिळाला. सध्या तापमानात घट झाल्याने मुंबईकरांना थंडीची चाहूल लागली आहे. हवामान विभागाने पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. राज्यात सर्वत्र थंडीची चाहूल लागली असताना काही जिल्ह्यात पावसाचे संकट कायम आहे.त्यामुळे शेतकरी देखील चिंतेत आहेत.
पुणे, कोल्हापूर, अहिल्यानगर, पुणे घाट परिसर, कोल्हापूर घाटमाथा भागात 29 व 30 ऑक्टोबर रोजी पावसाचं संकट कायम असणार आहे.तसेच यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा जिल्ह्यात 29 आणि 30 तारखेला वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, परभणी, बीड, नांदेड, धाराशिव, हिंगोली या जिल्ह्यात 72 तास हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील. हवामान विभागाने 20 जिल्ह्यांसाठी अलर्ट दिला असून मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. ठाणे आणि उपनगरात आज ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून विजांच्या कडकडाटासह रिमझिम पावसाची शक्यता आहे.
